Appeal to file complaints regarding arbitrary fare collection by private contract passenger vehicles
खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन
पुणे : खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे. rto.12-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध बसेस संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार खासगी कंत्राटी परवान्यावरील वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.
तथापि, काही खासगी प्रवासी बसेस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिमी भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स, बसेस यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक चालक यांनी नियमानुसार प्रवासी तिकीटदराची आकारणी करावी.
गणेशोत्सव व सणासुदीचा कालावधी सुरू होत आहे. या अनुषंगाने नागरिकांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत 020-26058080, 26058090 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा rto.12-mh@gov.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन”