पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त

Food-And-Drug-Administration

Prohibited stock worth Rs 47 lakh seized in Pune city

पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात टोनी दा ढाबा, पाषाण सर्व्हिस रोड, पाषाण येथील धडक मोहीमेत एमएच ४६ एआर ४९७३ या वाहनाचा पाठलाग करून ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा व एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.Food and Drug Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News.

औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहमेअंतर्गत १ वाहन जप्त करण्यात आले असून चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकासह तिघांवर एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत.

जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातुन राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदर्थावर उत्पादक साठा, वितरण, वाहतुक तसेच विक्री यावर १ वर्षाकरीता बंदी घातलेली आहे.

प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्री बाबतची माहिती असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा
Spread the love

One Comment on “पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *