Public Awareness Campaign of Government’s Public Welfare Schemes through Folk Art Squad from today
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची लोककला पथकाद्वारे आजपासून जनजागृती मोहिम
पुणे : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवून योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून लोककला पथकाद्वारे जिल्ह्यातील गावांमध्ये उद्या ९ मार्च पासून जनजागृती मोहिमेस सुरुवात करण्यात येत आहे. तीन लोककला पथकाद्वारे राबवण्यात येणारी ही मोहिम १७ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे.
मावळ तालुक्यात कामशेत, तळेगाव दाभाडे, लोणावळा, कार्ले व वडगाव मावळ, खेड तालुक्यात राजगुरुनगर, शेल पिंपळगाव, चाकण, भोसे व आळंदी, आंबेगाव तालुक्यात खडकी, वडगाव काशिंबेग, निरगुडसर, घोडेगाव, मंचर, अवसरी, डिंभे आणि जुन्नर तालुक्यात नारायणगाव, ओझर, जुन्नर व शिरोली येथे कलाछंद कलापथक कार्यक्रम करणार आहे.
बारामती तालुक्यात बारामती, मोरगाव, सुपे, माळेगाव, सोमेश्वर, वाणेवाडी, काटेवाडी, इंदापूर तालुक्यात सणसर, वालचंदनगर, कळंब, निमगाव केतकी, इंदापूर, लोणी, दौंड तालुक्यात कुरकुंभ, दौंड, पाटस, वरवंड, वाळकी तर शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथे प्रसन्न प्रोडक्शन कलापथक कार्यक्रम करणार आहे.
मुळशी तालुक्यात पिरंगुट, लवळे, पौड, कुळे, चाले, वेल्हा तालुक्यात वेल्हा, पाबे, दापोडे, हवेली तालुक्यात डोणजे, गोरे, खाणापूर, किरकटवाडी, धायरी गाव, भोर तालुक्यात भोर, नसरापूर, आळंदे, कापुरहोळ आणि पुरंदर तालुक्यात सासवड, जेजुरी आणि हिवरे, भिवरे येथे जय मल्हार कलामंच कलापथक कार्यक्रम करणार आहे.