Pune Municipal Corporation to set up an emergency work center at the regional office level for monsoon.

Pune Municipal Corporation to set up an emergency work center at the regional office level for monsoon.

As part of the monsoon preparations, emergency work centers will be set up at each field office level. The Municipal Corporation will start an Emergency Work Center before and during the monsoon. These centers will be at the level of Assistant Commissioner. These centers will be open 24 hours a day. Municipal Commissioner Vikram Kumar has also directed all field offices to start the center before June 15. These centers will be connected to the municipal main building disaster management centers.

In the last few monsoons, the incidence of floods in nallas and streams has been increasing in the city. Natural and man-made disasters are also on the rise in India due to sudden cloudburst rains in some parts of the city. In case of sudden heavy rains, the roads are clogged with drainage, which is hampering the flow of traffic and causing loss of life and property. Considering this  PMC has planned urgent work before and during the monsoon. Although this work is being carried out at the regional office level, in case of such incidents, the fire brigade as well as the disaster management system should be available to help the citizens and avoid possible loss of life.  Considering this, the system will be operationalized at the field office level from June 15. For this, the field office should prepare the list of mobile numbers and email IDs of the concerned employees by appointing them. Orders have also been issued to set up wireless systems in every place

पावसाळ्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन कार्य केंद्र . 

पावसाळ्याच्या तयारीचा भाग म्हणून ,प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर  आपत्कालीन कार्य केंद्र सुरु करण्यात येणार आहेत . पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यातील आपत्कालीन कामे व आपत्ती व्यवस्थापनासाठी  महापालिका आपत्कालीन कार्य केंद्र सुरू करणार आहे.  सहाय्यक आयुक्त स्तरावर ही  केंद्र असतील.  ही केंद्र 24 तास सुरु राहतील. तसेच ही केंद्र  15 जून पूर्वी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार  यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत .  ही केंद्र महापालिका मुख्य इमारत आपत्ती व्यवस्थापन केंद्रांशी जोडली  जाणार आहेत .

  गेल्या काही पावसाळ्यात शहरात नाले  व ओढ्यांच्या  पुराच्या घटना वाढत आहेत .  तसेच शहरातील एखाद्या भारतात अचानक ढग फुटी  सदृश्य पाऊस होत असल्याने नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती वाढत आहे.  अचानक मोठा पाऊस झाल्यास रस्त्यावर ठिकठिकाणी ड्रेनेज तुंबतात , त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे शिवाय जीवित आणि वित्तहानी होत आहे.  ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळ्यात तातडीच्या  कामाचे नियोजन केले आहे.  या कामाची अंमलबजावणी  क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून  होत असली, तरी अशा घटना घडल्यास  अग्निशमन दल, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उपलब्ध होऊन नागरिकांना मदत मिळावी, संभाव्य जीवित हानी टाळावी यासाठी क्षेत्रीय  कार्यालय  स्तरावर 24 तास यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक बाब आहे.  ही बाब लक्षात घेऊन 15 जून पासून क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे त्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करून त्यांचे मोबाईल क्रमांक ईमेल आयडी क्षेत्रीय कार्यालयाने तयार ठेवावे.  प्रत्येक ठिकाणी वायरलेस यंत्रणा उभारण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *