Inauguration of ‘Pune Pustak Parikrama’ at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ चे उद्धाटन
कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी दाखवला हिरवा झेंडा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ या फिरत्या वाचनालयाचे मराठी भाषा गौैरव दिनानिमित्त उद्धाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांनी या फिरत्या वाचनालयाला हिरवा झेंडा दाखवून उद्धाटन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे, माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. संजय किर्लोस्कर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री. राजेश पांडे, श्री. राज शेखर जोशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्रीमती बागेश्री मंठाळकर, प्रा. (डॉ.) धोंडीराम पवार, प्रा, संदीप पालवे, प्रा. डॉ. संगीता जगताप, श्री. सागर वैद्य, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, श्रीमती ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय पुस्तक न्यास व पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य व लिखाण याचा प्रसार व्हावा या उद्देशाने या फिरत्या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. आजपासून (२७ फेब्रुवारी) २४ मार्चपर्यंत हे फिरते वाचालय पुण्यातील विविध भागात, विविध शाळा, कॉलेजेसमध्ये फिरणार आहे. या वाचनालयात विज्ञान, साहित्य, बाल साहित्य, आत्मचरित्र अशा विविध विषयावरील पुस्तक हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. वाचकांना आत बसून पुस्तक वाचता येणार आहे. तसेच याठिकाणी पुस्तकांची विक्रीही करण्यात येणार असून सर्व पुस्तकांच्या खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ चे उद्धाटन”