Affiliation Agreement between Savitribai Phule Pune University and NBRI
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एन.बी.आर.आय मध्ये संलग्नता करार
संपूर्ण भारतातील वनस्पतींचे डिजीटल हरबेरीयम करण्याचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्यात येणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिटयूट लखनऊ (एन.बी.आर.आय) यांच्यात बुधवारी संलग्नता करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी व एन. बी. आर. आय. संचालक डॉ. अजित कुमार शासने, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, गुणवत्ता सुधार केंद्राचे संचालक प्रा. संजय ढोले, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए. बी. नदाफ यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करून कराराचे आदानप्रदान करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना देशातील उत्कृष्ट विद्यापीठापैकी एक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नता करार करताना अत्यंत आनंद होत असून या कराराअंतर्गत संयुक्त संशोधनाचे प्रस्ताव सादर केले जातील, अशी माहिती एन.बी.आर.आयचे संचालक डॉ. अजित कुमार शासने यांनी दिली.
वनस्पतिशास्त्र विभागाच्या मदतीने संपूर्ण भारतातील वनस्पतींचे डिजीटल हरबेरीयम करण्याचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या पुढाकाराने हा करार होत असल्याबद्दल कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी आनंद व्यक्त केला व कृत्रीम बुध्दीमत्ता वापरून वनस्पतींचे विश्लेषन करता येईल असेही त्यांनी यावेळी सुचवले.
‘Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एन.बी.आर.आय मध्ये संलग्नता करार”