Announcement of Savitribai Phule Pune University Jeevan Sadhana Awards
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवनसाधना पुरस्कारांची घोषणा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा
पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून नावलौकिक असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. १० फेब्रुवारीला विद्यापीठाचा ७५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह मा.ना. श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.
१० तारखेला हा कार्यक्रम दोन भागात होणार असून २ ते ४ दरम्यान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना, परिसंस्थांनां (महाविद्यालय) आणि ‘युवा गौरव पुरस्कार्थींना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. तर संध्याकाळी ४. ४५ वाजता आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मान्यवरांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या खाशाबा जाधव इनडोअर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठातर्फे विविध पुरस्कार देण्यात येतात. त्यातील महत्वाचा पुरस्कार म्हणजे ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’. यावर्षी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नऊ जणांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी भारताच्या माजी राष्ट्रपती तसेच विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आदरणीय श्रीमती प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल श्री. राम नाईक, कायदा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मा. पद्मश्री अॅड. उज्वल निकम, उद्योजकता व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मा. पद्मश्री मिलिंद कांबळे, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी कृषिरत्न मा. श्री. अनिल घमाजी मेहेर, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मा. श्री. सतीशराव शिवाजीराव काकडे देशमुख, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मा. श्री. कृष्णकुमार गोयल, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मा. प्राचार्य ठकाजी नारायण कानवडे आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मा. श्री. हेमंत हरिभाऊ धात्रक, यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे.
वर्धापन दिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार
युवा गौरव पुरस्कार (२०२३ – २४)
१. कला – श्री. माने मकरंद मधुकर – चित्रपट दिग्दर्शक व निर्माता
२. क्रीडा – 1) श्री. पुराणिक अभिमन्यू समीर – बुध्दिबळ
2) श्रीमती सोमण प्रणिता प्रफुल्ल – रोड सायकलिंग
3. साहित्य – श्री. जाधवर ज्ञानेश्वर प्रकाश – युवा साहित्य अकादमी पुरस्कार नामांकन व इतर
उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे, इन्स्टिटयुट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, पुणे ४११००१.
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग)- संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे, कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, ता. कोपरगाव, जि.अहमदनगर
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, प्रा.रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल, आकुर्डी, पिंपरी चिंचवड, पुणे
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डांग सेवा मंडळाचे, दादासाहेब बिडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, पेठ, जि. नाशिक
उत्कृष्ट प्राचार्य / संचालक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – डॉ. पाटील मनोहर जनार्दन, मराठवाडा मित्र मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पिंपरी रोड, थेरगांव, पुणे
२. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) डॉ. रसाळ पुंडलिक विठ्ठल मराठा विद्या प्रसारक समाजाचे जीएमडी कला बीडब्ल्यू वाणि आणि विज्ञान महाविद्यालय, ता सिन्नर, जि. नाशिक
उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. मुंजे रविंद्र कचरू कर्मवीर काकासाहेब वाघ इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, पंचवटी, नाशिक
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डॉ. सय्यद एतेशामुद्दीन शमशुद्दीन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, सहजानंदनगर, पो. शिंगणापूर, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – डॉ. गणपुले शिल्पागौरी प्रसाद , प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, पुणे
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम विभाग (ग्रामीण विभाग)- डॉ. मगदुम सुजाता मार्तंड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी, ता. दिंडोरी जि. नाशिक
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. आर अरोकिया प्रिया चार्ल्स डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च, रावेत, आकुर्डी, पुणे
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग)- डॉ. खियानी सिमरन राजीव जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, पुणे-नगर रोड, वापोली, पुणे
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. भाकरे शरयु सुरेश, सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सेनापती बापट रोड, पुणे
४.अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डॉ. मुळे योगिनी रामकृष्ण, तुळजाराम चतुरचंद, बारामती, जि. पुणे
उत्कृष्ट नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम / संशोधन पुरस्कार
१. डॉ. लोमटे बिना माधवराव – | रसिकलाल एम. धारीवाल सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूट्टस कॅम्पस, वारजे, मुंबई – बंगलोर बायपास, पुणे
उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार (शहरी विभाग)
१. शहरी विभाग – डॉ. नाईकवाडी प्रियांका विठ्ठल श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे
उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण व क्रिडा पुरस्कार
१. शहरी विभाग – डॉ. शेंडेंकर दीपक तानाजी, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे
२. ग्रामीण विभाग – डॉ. जाधव नारायण माधव, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगांव, ता. निफाड, जि. नाशिक
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अध्यापकांचा सत्कार
१. डॉ. मारू अविश व्दारकादास, लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी, नूर, ता. कळवण, जि. नाशिक
उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार (विज्ञान / तंत्रज्ञान विद्याशाखा )
१. वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. संयुक्तपणे
विभागुन जैवतंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विद्यापीठाच्या जीवनसाधना पुरस्कारांची घोषणा”