Punekar’s ingenuity is commendable – MLA Chandrakant Patil
पुणेकरांची कल्पकता वाखाणण्याजोगी – आ.चंद्रकांत पाटील
मेट्रोमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत – नागरिकांनी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करावा
पुणे : मेट्रो चे स्वागत करताना पुणेकरांची कल्पकता वाखाणण्याजोगी असून मेट्रोचा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यामुळे कोथरूड मधील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल असे आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
जोशी रेल्वे म्युझियम चे श्री. रवी जोशी यांनी मेट्रो च्या स्वागतासाठी मेट्रोच्या प्रतिकृतीचे की-चेन तयार केले असून त्याच्या छोटेखानी प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर ई मान्यवर उपस्थित होते.
येत्या काही वर्षात मेट्रोचे जाळे शहरभर उभे राहील आणि त्यातून शहरातील वाहतूक कोंडी सुटेल असेही ते म्हणाले. नागरिकांनी जास्तीतजास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असेही भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
जोशी रेल्वे म्युझियमचा समावेश पुणे दर्शन च्या स्थळा मध्ये असूनही येथे बस येत नाही अशी खंत रवि जोशी यांनी व्यक्त केली व पुण्यातील हे आगळेवेगळे म्युझियम सर्वाना बघायला मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.