Punyashlok Rajmata Ahilya Devi Holkar Jayanti 

On the occasion of Punyashlok Rajmata Ahilya Devi Holkar Jayanti Grateful greetings from Deputy Chief Minister Ajit Pawar.

 Punyashlok Rajmata Ahilya Devi Holkar built a mountain of public works across the country across caste, creed, religion, creed, province, border. She built temples, river ghats, Dharamsalas, and Panapois all over the country. Fought against undesirable norms, customs, traditions. Deputy Chief Minister Ajit Pawar has paid homage to Ahilya Devi Mansaheb by remembering her work and thoughts.

Punyashlok Rajmata Ahilya Devi Holkar Ideal ruler of all time, nation builder             

Deputy Chief Minister Ajit Pawar

 

Recalling her work on the occasion of Punyashlok Ahilya Devi’s birthday, Deputy Chief Minister Ajit Pawar said that Punyashlok Ahilya Devi was a great warrior. She was a skilled administrator, just, public-spirited, generous ruler. He criticized efficient governance by separating the civil and military administrations. Worked on women empowerment. Gave women education, training, rights. Encouraged by removing injustice on farmers, traders. Folk art gave shelter to artists. Adopted a policy of promoting industries. Ahilya Devi was a great ruler. She was a great thinker. His ideas were reformist, anti-superstitious. His deeds and thoughts are ideal for rulers all over the world, said Deputy Chief Minister Ajit Pawar.

 

Ajit Pawar
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन. 

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जात, पात, धर्म, पंथ, प्रांतांच्या, सीमा ओलांडून संपूर्ण देशात लोकोपयोगी कार्याचा डोंगर उभा केला. देशभर मंदिर, नदी घाट, धर्मशाळा, पाणपोई बांधल्या. अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा यांच्याविरुद्ध लढा दिला. त्या सर्वकालीन आदर्श राज्यकर्त्या, राष्ट्रनिर्मात्या आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक, राजमाता, अहिल्यादेवी माँसाहेबांच्या कार्याचं, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वकालीन आदर्श राज्यकर्त्या, राष्ट्रनिर्मात्या

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणूक त्यांनी दाखवली. महिलांच्या सक्षमीकरणाचं काम केलं. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवर अन्याय दूर करून प्रोत्साहन दिले. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले. अहिल्यादेवी महान राज्यकर्त्या होत्या. थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांचे कार्य, विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *