पुनर्विकास करुन ठाणे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Railway Minister announces to give international status to Thane station by redevelopment

पुनर्विकास करुन ठाणे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार असून त्याला जागतिक दर्जाचे स्थानक केले जाणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ठाण्यात केली. हे करतानाच रेल्वे

Railways Minister Ashwini Vaishnaw
File Photo

स्थानकाचा वारसा जपला जाणार असल्याचं ते म्हणाले. नव्या रेल्वे मार्गांच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांना संबोधित करत होते. मुंबईतल्या AC लोकलचे भाडे कमी करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. मेट्रोचे भाडे आणि इतर मुद्द्यांचा विचार करून रेल्वे मंडळ यावर लवकरच निर्णय घेईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

ऐरोली ते कळवा दरम्यान उभारण्यात येत असलेल्या नव्या रेल्वे मार्गामुळे विस्थपित होणाऱ्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकार सोबत योजना आखण्याचा निर्णय झाल्याचे ते म्हणाले. रेल्वेची जमीन SRA ला देऊन गरिबांचे पुनर्वसन करावे. त्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल असे आश्वासन यावेळी बोलताना राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड दिले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *