Railway services are now gradually resuming due to the decline in Corona’s influence
कोरोनाचा प्रार्दुभाव ओसरल्यामुळे रेल्वे सेवा आता टप्याटप्यानं पूर्वपदावर
कोरोनाचा प्रार्दुभाव ओसरत असल्यामुळे रेल्वे सेवा आता टप्याटप्यानं पूर्वपदावर येत आहे. आरक्षित तिकिटासह इतर अनेक रेल्वेगाड्या आता नियमितपणे धावू लागल्या आहेत.
त्यामुळे मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी पूर्वीप्रमाणेच मासिक पासची सेवा सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेचे प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत.
मात्र ही सेवा आरक्षित रेल्वे गाड्यांसाठी सुरू नसल्याचं मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे.
सर्वच गाड्यांना मासिक सीझन पास सुविधा दिली जाणार असा या पत्राचा अर्थ काढला जात आहे. मात्र सीझन पासची सेवा ही फक्त डेमू आणि लोकल रेल्वे गाड्यांसाठीच सुरू केली जाणार आहे.
पुणे- सातारा आणि पुणे- कोल्हापूर या रेल्वे डेमू गाड्यांसाठी मासिक सीझन पास सेवा सुरू झाली नव्हती. पण आता त्या गाड्यांसाठीही सेवा सुरु केली जाणार आहे.