देशातल्या ४० कोटी फिचर फोन धारकांसाठी यु पी आय सुविधेचा रिझर्व्ह बँकेकडून मुंबईत प्रारंभ

RBI launches UPI facility in Mumbai for 40 crore feature phone holders in the country

देशातल्या ४० कोटी फिचर फोन धारकांसाठी यु पी आय सुविधेचा रिझर्व्ह बँकेकडून मुंबईत प्रारंभ

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आजपासून फिचर फोन धारकांसाठी यु पी आय ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत या सेवेचा प्रारंभ केला.

Reserve Bank of India
Reserve Bank of India

भारतात सध्या सुमारे ४० कोटी लोक या फिचर फोन्स चा वापर करत आहेत. हे फिचर फोन , की पॅड युक्त असून स्मार्ट फोनपेक्षा स्वस्त असतात, पण त्यात आतापर्यंत युपीआय सुविधा  वापरता येत नसल्यामुळे फिचर फोन धारक डिजिटल पेमेम्ट करू शकत नव्हते. यापुढं त्यांनाही डिजिटल पेमेंट करता येईल.

या सुविधेचं नाव ‘युपीआय १२३ पे’ असं असून यासाठी इंटरनेटची गरज नसेल. हि सुविधा सध्या फक्त इंग्लिश आणि हिंदी भाषेत उपलब्ध असली तरी पुढे ती अनेक भारतीय भाषा मध्येही वापरता येईल असं बँकेनं म्हटलं आहे.

शक्तिकांत दास यांनी आज सतत कार्यरत असणाऱ्या डिजिटल पेमेंट हेल्पलाइनचाही प्रारंभ केला. या हेल्पलाइनद्वारे डिजिटल पेमेंटसंबंधातील नागरिकांच्या शंकांचं निरसन होईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *