वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

Book HD Image by https://commons.wikimedia.org/ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Various programs in the state on the occasion of Reading Inspiration Day

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रम

मुंबई : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

Book-Reading-Book-Image
Image by Pixabay.com

वाचन प्रेरणा दिनानिमित्त रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास’ या ग्रंथावर ‘चर्चा व अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई येथे हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्रातील साहित्य संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने देखील महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचनकट्टा, व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना दोन हजार पत्रांचे लेखन’ असे कार्यक्रम महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे होतील.

दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पूज्य साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटुर, जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व काव्यवाचन : लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम आ.मा.शाळा व वि.जा.भ.ज. कमवि कुंटुरतांडा, ता.नायगाव, जि.नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘आम्ही काय वाचतो आणि का वाचतो ?’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मनोगत हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

तसेच सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘अभिवाचन व काव्यवाचन’ हा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान व अभिवाचन’ हा कार्यक्रम मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, मुंबई येथे होईल. त्याचप्रमाणे सायंकाळी ७ वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘नाट्यअभिवाचन : संगीत देवबाभळी’ हा कार्यक्रम नाईट कॉलेज ऑफ आर्टस् ॲण्ड कॉमर्स, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचन संस्कृतीचे वर्तमान आणि युवक’ हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सायंकाळी ५.३० वाजता मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पुस्तकावर निबंधवाचन व चर्चा’ हा कार्यक्रम ना.गो.नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कथाकथन’ हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे होईल. तर सकाळी १० वाजता जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : वाचनाचे महत्त्व’ हा कार्यक्रम ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून सकाळी ११.३० वाजता मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘मराठी गद्यलेखनाचे अभिवाचन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : समकालीन वाचनसंस्कृती’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, सकाळी १० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘व्याख्यान : कशासाठी वाचायचे ?’ हा कार्यक्रम पेठवडगाव, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘परिसंवाद’ इचलकरंजी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा-पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘वाचक मेळावा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वरील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. पाटील यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार
Spread the love

One Comment on “वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *