२२ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे' The Regional Transport Officer, Pune हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

As the government announced a public holiday on January 22, there has been a change in the functioning of the Regional Transport Office

शासनाने २२ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

पुणे : श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने दिवे ट्रॅक, आळंदी रस्ता कार्यालय, आयडीटीआर (नाशिक फाटा) व संगम ब्रिज मुख्यालय कामकाजात बदल करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.

Regional Transport Office, Pune. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.
Regional Transport Office

दिवे येथील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, आळंदी रस्ता येथील अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, आयडीटीआर येथील अनुज्ञप्ती चाचणी व संगम ब्रिज मुख्यालय येथील शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीसाठी ज्या नागरिकांनी, वाहनधारकांनी २२ जानेवारी रोजीच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्या आहेत त्यांची २३ ते २५ जानेवारी दरम्यान सुधारीत अपॉइंटमेंट दिली जाणार आहे.

वाहन तपासणी, अनुज्ञप्ती चाचणी व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विषयक कामकाजात झालेल्या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
शैक्षणिक, शासकीय संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी
Spread the love

One Comment on “२२ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *