The process of registration and distribution of residential flats at Hadapsar and Vimannagar will start from Friday.
Due to Pune Metro Project 1, 2, and 3, the government has decided to distribute the available residential flats at Vimannagar and Hadapsar free of cost to the eligible slum dwellers in the affected slums at Kamgar Putala and Rajiv Gandhi Nagar, Shivajinagar, Pune. And registration of all available residential flats in Hadapsar and distribution of actual flats on Friday. It will be completed from June 4 to Tuesday, June 8, 2021 (including weekends and weekends), Rajendra Nimbalkar, Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, said in a press release.
Holders of all flats in C & D Wing building at Hadapsar are required to register with Co-Secondary Registrar, Class-II, Haveli No. 10,5, Finance Road, Government Photo Registration Office Building, 1st Floor, Behind District Collector’s Office, C-Vimannagar at Pune-1 D, the remaining flat holders in the wing are co-registrar class-2, mansion no. 21 and 22, Survey no. 39/2/2, City Survey No.943, Opposite Gandhi Lawns, Yugai Mangal, 1st Floor, Erandwane, while flat holders in E-Wing at Vimannagar have been allotted to Co-Secondary Registrar, Class-II, Haveli No.25, in front of Winnie Yard Church Registration should be done at Siddhi Towers, Behind CNG Petrol Pump, Ganesh Nagar, Dapodi, Pune-12.
Registration of flats as above is a priority for the first attendee. Registration of 30 flats per office will be done on a token basis every day from 10 am to 6 pm in the office of the above five concerned Deputy Registrars. Original Aadhaar card and this instruction form must be brought along. However, the concerned should be present in their respective office on time.
If you are not present on the given day and time for registration of flats as above and/or do not take possession of their flats within the stipulated period of registration, you will be deemed to be unwilling to accept Yakami flats. Everyone should take note of this. More information has been published on the office’s website www.sra.gov.in
हडपसर व विमान नगर येथील निवासी सदनिकांची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु.
पुणे मेट्रो प्रकल्प 1, 2 व 3 यामुळे कामगार पुतळा व राजीव गांधी नगर, शिवाजीनगर, पुणे येथील बाधीत होणाऱ्या झोपडपट्ट्यांमधील पात्र झोपडीधारकांना विमाननगर व हडपसर येथील उपलब्ध असलेल्या निवासी सदनिकांचे मोफत वाटप करणेबाबत शासनाकडून निर्णय झाला असून सर्व पात्र झोपडीधारकांना वितरीत करावयाच्या विमान नगर येथील उर्वरीत व हडपसर येथील सर्व उपलब्ध निवासी सदनिकांच्या नोंदणीकरण चे (रजिस्ट्रेशन) व प्रत्यक्ष सदनिका वितरीत करण्याचे काम शुक्रवार दि. 4 जून ते मंगळवार दि.8 जून 2021 पर्यंत (शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवसांसह) पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
हडपसर येथील सी व डी विंग इमारतीमधील सर्व सदनिका धारकांनी सह-दुय्यम निबंधक, वर्ग-2, हवेली क्र.10,5, फायनान्स रोड, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पुणे-1 येथे विमाननगर येथील सी, डी, विंग मधील उर्वरित सदनिका धारकांनी सह-निबंधक वर्ग-2, अनुक्रमे हवेली क्र. 21 व 22, सर्व्हे नं. 39/2/2, सिटी सर्व्हे नं.943, गांधी लॉन्स समोर, युगाई मंगल, पहिला मजला, एरंडवणे येथे तर विमाननगर येथील ई विंग मधील सदनिका धारकांनी सह-दुय्यम निबंधक, वर्ग-2, हवेली क्र.25, विनी यार्ड चर्चच्यासमोर, सिध्दी टॉवर्स, सीएनजी पेट्रोल पंप मागे, गणेशनगर, दापोडी, पुणे-12 येथे नोंदणी करावी.
वरीलप्रमाणे सदनिकांचे नोंदणीकरण हे प्रथम उपस्थित राहणा-यास प्राधान्य त्यानुसार वरील पाचही संबंधित सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत प्रति कार्यालय 30 सदनिकांचे टोकन पध्दतीने नोंदणीकरण करण्यात येईल. मूळ आधारकार्ड व हे सुचनापत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तरी त्यानुसार संबंधितांनी आपल्या संबंधित कार्यालयामध्ये वेळेत उपस्थित रहावे.
वरीलप्रमाणे सदनिकेच्या नोंदणीकरीता आपण दिलेल्या दिवशी व वेळी उपस्थित न राहिल्यास आणि / अथवा नोंदणीकरण होऊन निश्चित केलेल्या कालावधीत प्रत्यक्ष त्यांचे सदनिकेचा ताबा न घेतल्यास त्यांना याकामी सदनिका स्विकारणेसाठी आपण इच्छुक नाही असे समजून आपणांस वितरीत करण्यात आलेली मोफत सदनिका रद्द करण्याची व आपली सध्याच्या झोपडीच्या निष्कासनाची कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. याची अधिक माहिती कार्यालयाच्या www.srapune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.