Restrictions in the state will be further relaxed in March – Rajesh Tope
राज्यातले निर्बंध मार्चमध्ये आणखी शिथिल करण्यात येतील – राजेश टोपे
कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आणखी शिथिल करण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
चित्रपटगृह, नाट्यगृह आणि लग्नसमारंभ यामध्ये सहभागी होणाऱ्यांच्या संख्येवर असलेली मर्यादा देखील शिथील होण्याची शक्यता टोपे यांनी दर्शवली.
केंद्र सरकार तसंच राज्याच्या कृती दलानंही यासाठी शिफारस केल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात आतापर्यंत १५ कोटी ३७ लाखांहून अधिक लसीच्या मात्रा पुर्ण
राज्यात आतापर्यंत १५ कोटी ३७ लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून ८ कोटी ७१ लाखांहून अधिक नागरिकांना पहिली तर साडे ६ कोटींहून अधिक नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
राज्यातील १४ लाख ३० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना वर्धक मात्रा देण्यात आली असून १५ ते १८ वर्षं वयोगटातल्या ४६ लाख २९ हजारांहून अधिक मुलांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.