साधना विद्यालय पालक – शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य दत्तात्रय जाधव यांची निवड

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Selection of Principal Dattatray Jadhav as President of Sadhana Vidyalaya Parent-Teacher Association

साधना विद्यालय पालक – शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य दत्तात्रय जाधव यांची निवड

हडपसर: शाळेच्या प्रत्येक वर्गात उद्याचा सुजाण नागरीक तयार होतो. या शैक्षणिक प्रक्रियेत समाजाचा,पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.शाळेच्या भौतिक प्रगतीत व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ विकासात पालकांचा सहभाग निर्माण व्हावा,शालेय निर्णयात समाजाचा सहभाग वाढावा यासाठी शासनाने शाळा पातळीवर विविध समित्या निर्धारित केल्या आहेत. यामध्ये पालक-शिक्षक संघ,माता पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती,शाळा व्यवस्थापन व विद्यासमिती या महत्त्वाच्या समित्या आहेत.Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

साधना विद्यालयात या सर्व समित्यांची सभा घेऊन शासन निर्देशानुसार लोकशाही पद्धतीने कार्यकारिणी निवडण्यात आली. पालक-शिक्षक संघ व इतर समित्यांच्या अध्यक्षपदी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पालक-शिक्षक संघ सचिवपदी मंगेश ढोणे,उपाध्यक्षपदी कांतीलाल काळे,सहसचिवपदी गणेश हिरे यांची निवड करण्यात आली. माता पालक संघ उपाध्यक्षपदी सोनाली गायकवाड,सचिवपदी रूपाली सोनावळे तर सहसचिवपदी स्वाती ढाकणे यांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संगिता होगले, उपाध्यक्षपदी शशिकांत गोविंदवाड यांची निवड करण्यात आली. गुरूकूल पालक संघाच्या उपाध्यक्षपदी गंगा जाधव,सचिवपदी पूनम गवते,सहसचिवपदी सोनाली काकडे यांची निवड करण्यात आली.

या सभेसाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर,धनाजी सावंत,बहुसंख्येने पालक,सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन शिंदे यानी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले, तर आभार मंगेश ढोणे यांनी मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
२२ जुलै २३ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धा – २०२३
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *