Hindi Day Celebrated in Sadhana Vidyalaya
साधना विद्यालयात हिंदी दिन साजरा
विद्यार्थ्यांनी हिंदी गीते,नाटिका,समूह गीते,हिंदी दोहे यांचे केले सादरीकरण
हडपसर: 14 सप्टेंबर हा दिवस भारतभर हिंदी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात राज्यव्यव्हरात हिंदीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो.परंतु हिंदी भाषेचा केवळ एकच दिवस गौरव न करता नेहमीच हिंदी भाषेचा गौरव करावा ,दैनंदिन जीवनात हिंदीचाही इतर भाषांप्रमाणे वापर करावा, असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सचित्रा हेंद्रे यांनी हिंदी भाषा गौरवगीत सादर केले. सार्थक सुर्यवंशी ,आशीष मिसाळ या विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाची माहिती सांगितली. सुवर्णा कांबळे यांनी शिक्षक मनोगतात हिंदी दिन का साजरा करतात व हिंदी भाषेचं महत्त्व सांगितले.हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी हिंदी गीते,नाटिका, समूह गीते,हिंदी दोहे यांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे ,पांडूरंग गाडेकर,धनाजी सावंत सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष केंगले यांनी केले.सूत्रसंचालन कामिनी केदारे यांनी केले.तर आभार रेखा जाधव यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “साधना विद्यालयात हिंदी दिन साजरा”