साधना विद्यालयात शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

City-Level Science Exhibition begins at Sadhana Vidyalaya

साधना विद्यालयात शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ

हडपसर : साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्युनियर कॉलेज, चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालय, पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग), पुणे शहर मुख्याध्यापक संघ व विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आयोजित ५२ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. १९ डिसेंबर रोजी साधना विद्यालय, हडपसर येथे सुरू झाले.Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” हा असून, इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ते आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर, सहाय्यक यांचा सहभाग असून सुमारे ३०० शैक्षणिक उपकरणे व प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी धनंजय धानापुणे, शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे संपर्क अधिकारी अर्चना नलवडे, राज्य मुख्याध्यापक संघ सचिव नंदकुमार सागर, रयत शिक्षण संस्थेचे अरविंद भाऊ तुपे, साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, कन्या विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, समग्र शिक्षणच्या अश्विनी ननवरे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन समारंभानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे निरीक्षण केले व त्यांचे कौतुक केले.

“आपले जीवन विज्ञानावर आधारित आहे आणि त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होईल,” असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले.

हे प्रदर्शन २० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, त्यामध्ये सहभागी प्रकल्पांचे परीक्षण करून उत्कृष्ट प्रयोगांना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे बक्षिसे दिली जातील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ, रूपाली सोनावळे व सविता पाषाणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवाजी मोहिते यांनी मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

भारताला लवकरच जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो जाळे

Spread the love

One Comment on “साधना विद्यालयात शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *