Savitribai Phule is the pioneer of women’s education
सावित्रीबाई फुले स्त्रीशिक्षणाच्या जनक – उपमुख्याध्यापिका योजना निकम .
हडपसर : थोर समाजसुधारक,विचारवंत,लेखक,महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण ,अस्पृश्य उद्धार आणि समाजसुधारणेचा वसा घेतला होता . शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाचे बहुमोल कार्य केले . स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगणाऱ्या अशा थोर महापुरूषांचे विचार आपण आचरणात आणावेत . सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने स्त्रीशिक्षणाच्या जनक होत्या असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम यांनी केले .
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विवेक राख,ओम बोबडे,श्रीराज साळुंके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . अनुराधा ननवरे यांनी शिक्षक मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या समग्र जीवनकार्याची आढावा घेतला .
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर,धनाजी सावंत सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष केंगले यानी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले तर आभार स्मिता पाटील यांनी मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
भारत – संयुक्त अरब अमिरातीचा संयुक्त लष्करी सराव ‘डेझर्ट सायक्लोन’ राजस्थानमध्ये सुरू
One Comment on “सावित्रीबाई फुले स्त्रीशिक्षणाच्या जनक”