Multilingual Poetry Conference at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहुभाषिक कविसंमेलन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग( रानडे इन्स्टिट्यूट) आणि अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑक्टोबरला बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कविसंमेलनात शालेय वा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वांना सहभाग होता येणार आहे. यावेळी सहभागींना मोजकी प्रस्तावना असलेली ‘सामाजिक जाणिवा किंवा वसुधैव कुटुंबकम’ या विषयांवरील, भारतीय भाषा किंवा परकीय भाषांमधील एक कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
रानडे इन्स्टिट्युटच्या सभागृहात होणाऱ्या या संमेलनात सहभागी होण्यासाठी कविता अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे (9960500827) यांच्याशी संपर्क साधून २३, २४ ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहुभाषिक कविसंमेलन”