The Savitribai Phule Honoring Ceremony was held at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा संपन्न
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभागामार्फत आयोजित सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त व जागतीक महिला दिनाच्या औचित्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यकत्तृत्वाने ठसा उमटवून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ भारूड सम्राज्ञी श्रीमती पद्मजा कुलकर्णी, , नाशिक, योगअभ्यासिका श्रीमती प्रज्ञा पाटील, पुणे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सकीना बेदी, पुणे, श्रीमती मनीषा तोकले, बीड, श्रीमती वैशाली गांधी, अहमदनगर या ५ महिलांचा सन्मान कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू, प्रा.डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा.डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापुरकर,श्रीमती बागेश्री मंठाळकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात करण्यात आला. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या आणि समाजात आपल्या कार्यकत्तृत्वाने ठसा उमटविणाऱ्या पाचही पुरस्कारार्थी महिलांना मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सलाम करतो असे यावेळी कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी गौरवोद्गार करतांना सांगितले.
विविध सामाजिक समस्यांवर काम करत असताना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले असून आमच्या प्रेरणास्थान असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मिळत असलेल्या पुरस्काराचे महत्व आमच्या दृष्टीने खूप मोलाचे आहे अशी भावना आपल्या मनोगतात पुरस्कारार्थी महिलांनी यावेळी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले सन्मान सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी केले. प्रास्ताविक व्यवस्थापन परिषद सदस्या श्रीमती बागेश्री मंठाळकर तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर यांनी कार्यक्रमाचे समारोप केले. प्रा. डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे लोकार्पण
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा संपन्न”