सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहं, विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून सुरू.

Savitribai Phule Pune University hostels for students starting from tomorrow.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहं, विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून सुरू.

Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune University .

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहं, पीएच.डी. आणि स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून सुरू करण्यात येत आहेत. त्याबरोबरच इतर वसतिगृहं देखील ५०% क्षमतेनं सुरू करण्यात येत असल्याचं विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी सांगितलं.

पीएच.डी तसंच स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी स्वतंत्र खोली असल्यानं या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यात येत असल्याचं परिपत्रक विद्यापीठानं काल प्रकाशित केलं आहे. अनेक दिवस वसतिगृहाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *