सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अहमदनगर उपकेंद्राचे उद्घाटन

Savitribai Phule Pune Universiy

Inauguration of Savitribai Phule Pune University sub-centre at Ahmednagar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अहमदनगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन

‘विद्यार्थी सुविधा केंद्रा’मुळे सवा लाख विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

राष्‍ट्रीय शैक्षणि‍क धोरणाची अंमलबजावणी करण्‍याचे मोठे आव्‍हान

पदवी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल याचाही विचार व्‍हावा

अहमदनगर: नव्‍या शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीमध्‍ये कौशल्‍य शिक्षणाला दिलेले प्राधान्‍य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ निर्माण करण्‍याचे काम विद्यापीठाच्‍या उपकेंद्रातून व्‍हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.Inauguration of Savitribai Phule Pune University sub-centre at Ahmednagar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अहमदनगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाले. उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील दुरदृष्‍य प्रणालीव्‍दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर , प्र. कुलसचिव डॉ विजय खरे, यांच्‍यासह व्‍यवस्‍थापन परिषदेचे सर्व सदस्‍य याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, नगर येथे उपकेंद्र व्‍हावे यासाठी सुरु असलेल्‍या प्रयत्‍नांना अनेक वर्षांनंतर यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्‍या राष्‍ट्रीय शैक्षणि‍क धोरणाची अंमलबजावणी करण्‍याचे मोठे आव्‍हान आपल्‍या सर्वांपुढे आहे. त्‍यासाठी आता विद्यापीठां बरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.

आज शिक्षणाच्‍या परिभाषा सर्व बदलल्‍या आहेत. एकाच वेळी अनेक विद्या शाखांचे ज्ञान संपादन करण्‍याची प्रक्रीया गतीने पुढे जात आहे. यामध्‍ये पुणे विद्यापीठालाही मागे राहुन चालणार नाही. कारण केवळ बी.ए, बी.कॉम सारख्‍या तत्‍सम पदव्‍या घेवून विद्यार्थी आता स्‍पर्धेत टिकू शकणार नाही. यासाठी या पदवी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल याचाही विचार व्‍हावा असे सुचीत केले. विद्यापीठाने आता आपली व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपकेंद्राच्‍या इमारतीची निर्मिती ही स्‍व.दादा पाटील शेळके यांची स्‍वप्‍नपुर्ती असून, २५ वर्षे न सुटलेला प्रश्न हा मागील दोन वर्षात मार्गी लागला. या उपकेंद्राच्‍या इमारतीमुळे गावाचे अन्‍य प्रश्‍नही सोडविण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

याप्रसंगी बोलतांना कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी विद्यापीठ येथे कौशल विकासवर आधारित अभ्यास क्रम चालवेल आणि रोजगार भिमुख शिक्षण देईल अशी भूमिका विषद केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनीही केले. तर आभार प्रदर्शन प्र. कुलसचिव डॉ विजय खरे यांनी मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सिनेट सदस्‍य सचिन गोर्डे पाटील यांनी केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

अभिलेखांचे जतन करणे काळाची गरज

Spread the love

One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या अहमदनगर उपकेंद्राचे उद्घाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *