यशस्वी विद्यार्थिनींमुळे सावित्रीबाईंचे स्वप्न साकार- भगतसिंह कोश्यारी

Savitribai’s dream come true due to successful students- Bhagat Singh Koshyari

यशस्वी विद्यार्थिनींमुळे सावित्रीबाईंचे स्वप्न साकार- भगतसिंह कोश्यारी

विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे :जेव्हा जेव्हा मला विद्यापीठांमध्ये पदवीप्रदान कार्यक्रमांसाठी बोलविण्यात येतं तेव्हा तेव्हा ‘मेडल’ घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक असते, त्यावेळी मला खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचं स्वप्नUnveiling of full size statue of Savitribai flower at University पूर्ण होत असल्याचा प्रत्यय येतो. या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा आपले मार्ग अधिक प्रशस्त करेल अशी आशा आहे असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुख्य इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवारी १४ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होते. तर व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. यावेळी शिल्पकार संजय परदेशी यांचा गौरव करण्यात आला, तर प्रा. हरी नरके यांच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

यावेळी कोश्यारी म्हणाले, ज्या प्रमाणे आपण इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्रयुध्दात लढा दिला त्याप्रमाणेच फुले दाम्पत्याने अनिष्ट प्रथा परंपरांविरोधात लढा दिला. सावित्रीबाईंनी सातत्याने समाजाला पुढे नेण्याचं काम केले असून हीच प्रेरणा घेत आपणही त्यांच्या मार्गावर जाऊ, हीच त्यांच्या कामाला दिलेली आदरांजली ठरेल.

उद्धव ठाकरे म्हणाले, सावित्रीबाई फुले स्वतः एक विद्यापीठ होत्या. भविष्यात त्यांचे अनेक पुतळे होतील, त्यांच्या नावाने शिक्षणसंस्था ओळखल्या जातील पण त्यांच्या शिकवणीचा वसा आपण पुढे नेला तरच समाजाचा उद्धार होईल. पुतळ्याच्या निमित्ताने विद्यापीठावर डोंगराएवढा विश्वास आम्ही टाकला असून सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढे नेण्याचे काम विद्यापीठ करेल अशी मी आशा करतो.

सावित्रीबाई फुले यांचा हा पुतळा १५०० किलो ब्रॉंजचा असून याची उंची साडेतेरा फूट आहे असे राजेश पांडे यांनी सांगितले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू एन.एस.उमराणी यांच्यासह विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद देशमुख यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *