Extension of deadline till 15th December for submission of applications for scholarship examination
शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याकरीता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली असून या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार नाही. याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज १५ डिसेंबरअखेरपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याकरीता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ”