Scholarship examination finally postponed.
The scholarship examination for class V and VIII in the state has finally been postponed. The examination was to be held on 23rd May. Scholarship examination is held in February every year. This year, it was scheduled to take the exam on April 25. However it was postponed again and it was scheduled to be held on May 23, but due to the outbreak of corona, it was postponed again.
Now on Monday, it has been decided to extend it further. Against this backdrop, the Commissioner of the Examination Council, Tukaram Supe, had sent a letter to Vandana Krishna, Additional Chief Secretary, School Education Department. Preparations for the examination were initiated by the Council. It was planned to deliver the exam material by May 15, but now it has been decided to postpone the exam again.
अखेर शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर.
राज्यात इयत्ता पाचवी व आठवी साठी ची शिष्यवृत्ती परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 23 मे रोजी घेण्यात येणार होतीशिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी घेण्यात येते. यंदा कोरोनामुळे परीक्षा 25 एप्रिल रोजी घेण्याचे आधी निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर 23 मे रोजी ती घेण्यात येणार होती परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती.
आता मात्र ती आणखी लांबणीवर टाकण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पत्र पाठवले होते. परीक्षेच्या आयोजनाची तयारी परिषदेकडून सुरू करण्यात आली होती. दिनांक 15 मेपर्यंत परीक्षेचे साहित्य पोचण्याचे नियोजन होते, पण आता मात्र परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Postgraduate medical course exams postponed for the second time due to corona.
Examinations for the summer 2021 postgraduate medical course of Maharashtra University of Health Sciences have been postponed for the second time against the backdrop of rising corona infection in the state. The exams were scheduled to start on June 24 but have now been postponed indefinitely. Dr. Ajit Pathak, Controller of Examinations, Maharashtra University of Health Sciences has issued a circular in this regard. It also said that the revised schedule of the examination would be announced later. Apart from this, students are urged not to believe in any rumors regarding the exams. He also said that one should visit the official website of the university to confirm the circular of the university.
Earlier, the examinations for this year’s academic postgraduate medical course were originally scheduled to start on May 25 but were postponed to June 24 due to corona condition. Now, the examination has been postponed indefinitely, the information about the same is available on the website of Maharashtra University of Health Sciences.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा कोरोनामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर.
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी 2021 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षा 24 जून पासून सुरू होणार होत्या मात्र त्या आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर अजित पाठक यांनी या संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या परिपत्रकाची खात्री करण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेत स्थळास भेट द्यावी असेही त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा सर्वात आधी 25 मे पासून सुरु होणार होत्या, त्या कोरोना स्थितीमुळे त्या पुढे ढकलण्यात येऊन 24 जून पासून सुरू होणार होत्या , आता पुन्हा त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत यासंबंधीचे परिपत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.