Call for applications for Scholarship, Subsistence Allowance Scheme
शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अर्ज सादर करण्यास ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत
पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनांचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावेत.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज छाननी करून शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय पुणे येथे सादर करावेत. महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी आवश्यक दक्षता घेवून विहित मुदतीत कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन”