Screening of more than 2 crore people in over 1 lakh health camps
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत 1 लाखांहून अधिक ग्रामपंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आयोजित आरोग्य शिबीरांमध्ये एकूण 2 कोटींहून अधिक लोकांनी केली तपासणी
8.5 लाखांहून अधिक लोकांची सिकलसेल आजाराची तपासणी आणि 27,630 हून अधिक लोकांना उच्च सार्वजनिक आरोग्य सुविधा घेण्यासाठी संदर्भित करण्यात आले
मुंबई :अंत्योदय’ तत्वानुसार शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आरोग्य सेवांची तरतूद दाखवून देणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये 2 कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत, आजपर्यंत 1,08,500 ग्रामपंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 2,10,24,874 लोकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घेतला आहे.
आरोग्य शिबिरांमध्ये खालील उपक्रम राबविण्यात येतात.
आयुष्मान भारत –
प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (एबी -पीएमजेएवाय ): विकसित भारत संकल्प यात्रेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पथदर्शी योजनेअंतर्गत आयुष्मान अॅप वापरून आयुष्मान कार्ड तयार केले जात आहेत आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्षरित्या कार्ड वितरित केले जात आहेत. 44 व्या दिवसाच्या अखेरीस, 32,54,611 पेक्षा अधिक कार्डचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या यात्रेअंतर्गत कार्यक्रम आयोजित केलेल्या जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत 1,44,80,498 कार्डे तयार करण्यात आली आहेत.
क्षयरोग (टीबी):
क्षयरोगाच्या रूग्णांची लक्षणे तपासणे, थुंकी तपासणी आणि उपलब्ध असेल तेथे नॅट (NAAT) यंत्र वापरून तपासणी केली जाते. क्षयरोगाच्या संशयित प्रकरणांना मोठ्या आरोग्य सुविधांकडे पाठवले जाते. 44 साव्या दिवसाच्या अखेरीस, 80,01,825 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4,86,043 हून अधिक लोकांना उपचारासाठी मोठ्या सार्वजनिक आरोग्य सुविधांकडे पाठवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान (पीएमटीबीएमए) अंतर्गत, क्षयग्रस्त रुग्णांना निक्षय मित्रांकडून मदत मिळण्यासाठी संमती घेतली जात आहे.निक्षय मित्र होऊ इच्छिणाऱ्या उपस्थितांना प्रत्यक्ष स्थळी नोंदणी देखील दिली जात आहे. 44 साव्या दिवसाच्या अखेरीस, 1,40,852 हून अधिक रुग्णांनी पीएमटीबीएमए अंतर्गत संमती दिली आणि 50,799 हून अधिक नवीन निक्षय मित्रांची नोंदणी झाली.
निक्षय पोषण योजना (एनपीवाय ) अंतर्गत, क्षयरोग रुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक मदत दिली जाते. यासाठी प्रलंबित लाभार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील गोळा करून खात्यांना आधार संलग्न करण्यात येत आहे.दिवसअखेरीस अशा 36,763 लाभार्थ्यांचे तपशील संकलित करण्यात आले.
सिकलसेल रोग :
प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागात, एससीडी साठी पॉइंट ऑफ केअर (पीओसी) चाचण्यांद्वारे किंवा द्राव्यता चाचणीद्वारे सिकलसेल रोग (एससीडी ) शोधण्यासाठी पात्र लोकसंख्येची (40 वर्षांपर्यंत) तपासणी केली जात आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण व्यवस्थापनासाठी उच्च वैद्यकीय केंद्रांकडे पाठवले जात आहेत. 44 साव्या दिवसाच्या अखेरीस, 8,51,194 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 27,630 लोक पॉझिटिव्ह आढळले आणि त्यांना उपचारासाठी उच्च सार्वजनिक वैद्यकीय सुविधांकडे पाठवण्यात आले.
असंसर्गजन्य रोग (एनसीडी)
उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी पात्र लोकसंख्येची (30 वर्षे आणि त्यावरील) तपासणी केली जात आहे आणि पॉझिटिव्ह संशयित रुग्ण उच्च वैद्यकीय केंद्रांकडे पाठवले जात आहेत. 44 साव्या दिवसाच्या अखेरीस, सुमारे 15,694,596 लोकांची उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करण्यात आली. 7,32,057 हून अधिक लोक उच्च रक्तदाबाचे संशयित निघाले आणि 5,28,563 हून अधिक लोक मधुमेहाचे संशयीत रुग्ण आढळून आले. आणि 11,56,927 हून अधिक लोकांना उच्च सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये संदर्भित करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “1 लाखांहून अधिक आरोग्य शिबीरांमध्ये 2 कोटींहून अधिक लोकांची तपासणी”