ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ अशोक लाहिरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास भेट

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Senior Economist Dr. Ashok Lahiri visits Savitribai Phule Pune University

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ अशोक लाहिरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास भेट

विद्यापीठाच्या संख्याशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र विभागांच्या वरिष्ठ प्राध्यापकांशी विविध विषयावर चर्चाSavitribai Phule Pune University

पुणे : – ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व सांख्यिकी विश्लेषक डॉ. अशोक लाहिरी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या दालनात भेट घेत विद्यापीठाशी संवाद साधला. शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र विभागांच्या वरिष्ठ प्राध्यापकांशी विविध विषयावर चर्चा केली. उच्च शिक्षण, अर्थकारण, नवीन शैक्षणिक धोरण यासंदर्भात त्यांनी आपले विचार यावेळी मांडले.

आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी विचाराचे आदान प्रदान आवश्यक असून सार्वजनिक विद्यापीठांनी आपली जबाबदारी ओळखून अधिक योगदान दिले पाहिजे तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या योगदानाने हे शक्य आहे असे त्यांनी प्रतिपादीत केले.यावेळी प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ. धोंडीराम पवार, डॉ. अपर्णा लळींगकर, राहुल पाखरे आदी उपस्थित होते.

डॉ. अशोक लाहिरी यांनी भारत सरकारचे अर्थविषयक सल्लागार म्हणून काम केले आहे तसेच ते पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत . बंधन बँकेचे अध्यक्ष, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालक असलेले डॉ. लाहिरी पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यही आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
पर्यावरण पूरक गणेशोत्सवाकरिता पुणे महानगरपालिकेचे नियोजन
Spread the love

One Comment on “ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ अशोक लाहिरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास भेट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *