जीएसटी चोरी रोखण्यासह, संकलनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी विविध राज्यांच्या स्थायी मंत्रीगटाकडून सात शिफारशी.

Seven recommendations from the Permanent Group of Ministers of various states to eliminate the error in the collection, including prevention of GST evasion.

जीएसटी चोरी रोखण्यासह, संकलनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी विविध राज्यांच्या स्थायी मंत्रीगटाकडून सात शिफारशी.

जीएसटी चोरी रोखण्यासह, संकलनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी विविध राज्यांच्या स्थायी मंत्रीगटानं सात शिफारशी केल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

Dy. CM.Ajit-Pawar
File Photo

यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या या मंत्रीगटाची दुसरी बैठक आज झाली. 

या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले.

जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणं, करदात्यांच्या बँकखात्यांचं ‘एनपीसीआय’ कडून प्रमाणिकरण, संशयित व्यावसायिकांचे गैरव्यवहार शोधण्यासाठी ‘फिडबॅक’ यंत्रणेची स्थापना, अशा सात शिफारशी जीएसटी परिषदेला करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पालनिवेल थियागा राजन, आसामच्या अर्थमंत्री अजंता नियोग यांनीही या बैठकीत विचार मांडले. केंद्रसरकार तसच गुजरात, दिल्ली, छत्तीसगड, ओदिशा, आंध्रप्रदेश या राज्यांच्या अर्थमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *