डॉ.भूषण पटवर्धन यांना शास्त्र विद्यापीठाचा ‘महामना पुरस्कार’

Shastra University's 'Mahamana Award' announced to Dr. Bhushan Patwardhan डॉ.भूषण पटवर्धन यांना शास्त्र विद्यापीठाचा ‘महामना पुरस्कार’ जाहीर हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

Shastra University’s ‘Mahamana Award’ announced to Dr. Bhushan Patwardhan

डॉ.भूषण पटवर्धन यांना शास्त्र विद्यापीठाचा ‘महामना पुरस्कार’ जाहीर

विज्ञान दिनी (२८ फेब्रुवारी) तंजावर येथील शास्त्र अभिमत विद्यापीठात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणारShastra University's 'Mahamana Award' announced to Dr. Bhushan Patwardhan
डॉ.भूषण पटवर्धन यांना शास्त्र विद्यापीठाचा ‘महामना पुरस्कार’ जाहीर
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेसचे प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांना शास्त्र विद्यापीठाचा ‘महामना पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. पंडित मदनमोहन मालवीय यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार भारतीय ज्ञान परंपरेतील शिक्षण व संशोधन आणि मूल्याधारित शिक्षण अशा क्षेत्रात मूलभूत व लक्षणीय योगदानासाठी दिला जातो.

तामिळनाडूमधील तंजावर येथील शास्त्र अभिमत विद्यापीठ २०२३ पासून पंडित मदनमोहन मालवीय यांच्य नावाने ‘महामना पुरस्कार’ प्रदान करत आहेत. भारतीय ज्ञान परंपरेतील शिक्षण व संशोधनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.

२०२४ चा ‘महामना पुरस्कार’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेसचे प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांना जाहीर झाला आहे. विज्ञान दिनी (२८ फेब्रुवारी) तंजावर येथील शास्त्र अभिमत विद्यापीठात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. भूषण पटवर्धन यांच्या या उपलब्धीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश
Spread the love

One Comment on “डॉ.भूषण पटवर्धन यांना शास्त्र विद्यापीठाचा ‘महामना पुरस्कार’”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *