मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

Chief Minister Eknath Shinde reviewed the preparations for the dedication ceremony of Shivdi-Nhawa Sheva Atal Setu. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

Chief Minister Eknath Shinde reviewed the preparations for the dedication ceremony of Shivdi-Nhawa Sheva Atal Setu.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा

रायगड : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुख्य कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होणार असल्याने या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. कार्यक्रमाचे दिमाखदार आणि काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.Chief Minister Eknath Shinde reviewed the preparations for the dedication ceremony of Shivdi-Nhawa Sheva Atal Setu.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर असलेल्या या सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजनदेखील दिमाखदार व्हावे. सिडको, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा व मनपा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग या सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करावी. तसेच सर्व यंत्रणांनी कामामध्ये परस्पर समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्था यांचे मार्गदर्शन घ्यावे असेही सांगितले.

अटल सेतूच्या शिवडी आणि चिर्ले या दोन्ही ठिकाणचा परिसर सुशोभित करण्यात यावा. तसेच या संपूर्ण मार्गाची नियमित स्वच्छता ठेवावी. चिर्ले ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर रोड फर्निचरचा वापर करावा. या मार्गाचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, आवश्यकता असेल तेथे दुरुस्ती तसेच परिसरातील भिंती रंगविणे आणि हरित पट्टे तयार करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, मोठ्या प्रमाणावर वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. लोकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यास कोणतीही अडचण होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाची तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करून सूचना दिल्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
‘एमटीएचएल’पाठोपाठ जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार
Spread the love

One Comment on “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *