Appeal to take advantage of skill development training organized by Sarathi
सारथीमार्फत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्यावतीने मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील राज्यातील वीस हजार उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी कौशत्य विकास प्रशिक्षण व अभ्यासक्रमासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सा. बा.मोहिते यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
2 Comments on “सारथीमार्फत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन”