श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

Khandoba-Temple-Jejuri जेजुरी देवस्थान मल्हारी मार्तंड खंडोबा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Traffic changes on November 13 in line with the Somvati Yatra of Shri Khandoba

श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल

पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

Traffic signal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image by Wikimedia Commons
https://commons.wikimedia.org/

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे यामार्गाने वळविण्यात येत आहे. . पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात येत आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल: बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल: पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ नोव्हेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखत

 

Spread the love

One Comment on “श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत बदल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *