All set to bring non-toxic, gentler, long-lasting hand sanitiser by Pune based start-up.
Pune based start-up all set to bring non-toxic, gentler, long-lasting hand sanitiser to the market. An environment-friendly hand sanitiser that is gentle on the hands and does not dry them, will soon be available in the market. The alcohol-free, aqueous, non-inflammable and non-toxic hand sanitiser has been developed from Silver Nanoparticles by a Pune based start-up.
Recurrent drying up of hands due to repeated application of hand sanitisers is a challenge that people have faced during the COVID 19 pandemic. The hand sanitiser developed by WeinnovateBiosolutions prolongs antimicrobial activity thus obviating the need for repeated applications. Silver nanoparticles give slow and sustained release of silver ions to kill microorganisms that come in contact. Besides, it can be stored in ambient conditions.
It has successfully completed the Central Drugs Standards Control Organisation (CDSCO) approved clinical trial for the hand sanitiser and demonstrated high efficiency in killing viruses. WeinnovateBiosolutionswas supported by the CAWACH 2020 grant of the National Science and Technology Entrepreneurship Development Board (NSTEDB) under the Department of Science and Technology (DST) and incubated at Entrepreneurship Development Centre (Venture Centre), Pune. They developed the colloidal silver solution-based hand sanitiser. The technology operates on the ability of the silver nanoparticles to prevent the synthesis of viral negative-strand RNA and viral budding.
“We are very confident of the study outcomes and waiting to get the license for our hand sanitiser formulation from CDSCO, India. We are sure that such innovation will push India towards its ‘Atmanirbhar Bharat’ mission and make India a self-sustained nation to face such pandemics in future”, said Dr Anupama Engineer, co-founder & COO WeinnovateBiosolutions.
Silver nanoparticles have been found to be an effective antiviral that acts against many deadly viruses like HIV, Hepatitis B, Herpes simplex virus, Influenza virus, and so on. Recent reports have suggested the role of Glutathione capped-Ag2S NCs (Silver nanoclusters) in inhibiting the proliferation of Coronavirus by preventing the synthesis of viral negative-strand RNA and viral budding. The colloidal silver on which the technology of the sanitisers of WeinnovateBiosolutions is based can help arrest Covid -19 spread by blocking the RNA replication and infectivity by blocking the surface glycoproteins. A study to evaluate the efficacy of hand sanitiser on different types of viruses is also currently underway by the group.
बिनविषारी, सौम्य आणि दीर्घकाळ टिकणारा हँड सॅनिटायझर लवकरच बाजारात येणार .
पुणे-स्थित स्टार्ट-अप लवकरच बिनविषारी, सौम्य आणि दीर्घकाळ टिकणारा हँड सॅनिटायझर बाजारात आणणार आहे. हातांसाठी सौम्य असणारा आणि हातांना कोरडे न करणारा पर्यावरण-स्नेही, दीर्घकाळ टिकणारा हँड सॅनिटायझर आता लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. पुणे-स्थित स्टार्ट-अपने चांदीच्या अतिसूक्ष्म कणांचा वापर करून हा अल्कोहोल विरहित, पाण्याचा समावेश असलेला, अ-ज्वलनशील आणि बिनविषारी हँड सॅनिटायझर विकसित केला आहे. हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर केल्यामुळे कोविड-19 महामारीच्या काळात अनेक लोकांना हात कोरडे पडण्याच्या समस्येला सतत तोंड द्यावे लागले आहे. नवीन विकसित केलेल्या ह्या हॅन्ड सॅनिटायझर मुळे ही समस्या उदभवणार नाही.
पुण्यातील ‘वुईइनोव्हेट-बायोसोल्युशन्स’ या स्टार्ट-अप ने विकसित केलेला हँड सॅनिटायझर सूक्ष्मजीव विरोधी प्रक्रिया दीर्घकाळ सुरु ठेवणारा आहे. त्यामुळे तो पुनःपुन्हा लावण्याची गरज भासणार नाही. चांदीचे अतिसूक्ष्म कण संपर्कात येणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नायनाट करण्यासाठी हळूहळू आणि सातत्याने चांदीच्या आयनांचा स्त्रोत सोडतात. अल्कोहोल विरहित असणारा हा सॅनिटायझर सर्वसामान्य वातावरणातही साठवून ठेवता येतो. या सॅनिटायझरने केंद्रीय औषध प्रमाणक नियंत्रण संस्थेने सॅनिटायझरसाठी मंजूर केलेली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून ह्या सॅनिटायझरने उच्च प्रतीची विषाणूनाशक क्षमता दर्शविली आहे.
‘वुईइनोव्हेट-बायोसोल्युशन्स’ या संस्थेला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाकडून (NSTEDB) ‘कवच 2020’ अनुदान मिळाले आहे, आणि या संस्थेचे पुढील विकसन पुण्याच्या उद्योजकता विकास केंद्र (Venture Centre) येथे झाले आहे. त्यांनी कोलॉईडल चांदीच्या द्रावणावर आधारित हँड सॅनिटायझर विकसित केला आहे. विषाणूमधील विशिष्ट RNA धाग्याचे संश्लेषण आणि विषाणूचे अंकुरण थांबविण्याच्या चांदीच्या सूक्ष्मकणांच्या क्षमतेचा वापर करून घेण्यावर हे तंत्रज्ञान आधारलेले आहे.
“या सॅनिटायझरबाबतच्या अभ्यासाबद्दल आम्हाला पूर्ण खात्री असून आता आम्ही या हँड सॅनिटायझरच्या विशिष्ट औषधी सूत्राला भारताच्या केंद्रीय औषध प्रमाणक नियंत्रण संस्थेकडून परवाना मिळण्याची वाट पाहत आहोत. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण संशोधन भारताला त्याच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या दिशेने वेगाने प्रगती करण्यास मदत करेल, आणि भविष्यात अशा महामारीला तोंड देण्यासाठी देशाला स्वावलंबी होण्यासाठी सक्षम करेल,” असे या संस्थेच्या सह-संस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी डॉ.अनुपमा इंजिनियर यांनी सांगितले.
चांदीचे अतिसूक्ष्म कण अत्यंत परिणामकारक विषाणूरोधक असल्याचे सिध्द ले आहे त्यामुळे हे कण एचआयव्ही, कावीळ, नागीण, फ्ल्यू आणि इतर अनेक प्राणघातक विषाणूंच्या विरोधात उपयुक्त ठरतात. नुकत्याच हाती आलेल्या अहवालातून असे सुचविण्यात आले आहे की, चांदीच्या अतिसूक्ष्म कणांतील काही घटक कोरोना विषाणूमधील विशिष्ट RNA धाग्याचे संश्लेषण आणि विषाणूचे अंकुरण थांबविण्यात यशस्वी ठरतात. ज्या गुणधर्मावर ‘वुईइनोव्हेटबायोसोल्युशन्स’ या संस्थेच्या हँड सॅनिटायझरचे तंत्रज्ञान आधारित आहे ती कोलॉईडल चांदी कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील ग्लायकोप्रोटिन्सना अवरोध निर्माण करून विषाणूची वाढ आणि संसर्गक्षमता यांना प्रतिबंध करते आणि ज्यामुळे कोविड-19 संसर्गाच्या प्रसाराला अटकाव करता येतो.
या हँड सॅनिटायझरची विविध प्रकारच्या विषाणूंविरोधातील कार्यक्षमता तपासण्यासाठीचा अभ्यास सध्या सुरु आहे.