सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी पोर्टलचे उद्धाटन

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Inauguration of PhD Portal at Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी पोर्टलचे उद्धाटन

पीएचडीसंबंधी सर्व माहिती एका क्लिकवरSavitribai Phule Pune University

पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग पोर्टल’चे   अनावरण करण्यात आले. पीएचडी करू इच्छिणाऱ्या तसेच करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या या पोर्टलचे अनावरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे, सहायक कुलसचिव श्री. मोहन बेलेकर, श्री. श्रीपाद बुरकुले, माहिती तंत्रज्ञान कक्षाचे व्यवस्थापक श्री. नितीन पाटील, श्री. झुंजार भामरे, एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिपक हर्डीकर, श्री. अशोक काळे आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी या पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे.

या पोर्टलवर पीएचडी प्रवेशपूर्व परिक्षेसंबंधी, अ‍ॅडमिशनसंबंधी, कोर्ससंबंधी, पात्रतेसंबंधी आणि फीसंबंधी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे तुम्हाला तुमचा पीएचडीचा प्रवास म्हणजेच पूर्वपरिक्षा, अ‍ॅडमिशन, अपलोड केलेले कागदपत्र, तुमचे थिसीस, शिष्यवृत्ती ही सर्व माहिती ट्रॅक करता येणार आहे. फॉर्म भरण्यापासून डिक्लेरेशन पर्यंत सर्व प्रक्रिया या एकचा पोर्टलवर करता येणार आहे.

या पोर्टलवर तुम्हाला तुमच्या विषयासाठी उपलब्ध असलेल्या गाईड, रिसर्च सेंटरची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टल वापरण्यासाठी कुठलही रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करण्याची गरज नाही. या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांचा पीएचडीचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. Ph.D. Admission and Tracking Portal  (https://bcud.unipune.ac.in/Phd/Ph.D_Addmission/index.html ) ही या पोर्टलची लिंक असून विद्यार्थ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग

Spread the love

One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी पोर्टलचे उद्धाटन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *