Sri Lanka fell in the first Test between India and Sri Lanka at Mohali
भारत- श्रीलंका यांच्यात मोहाली इथं सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेची पडझड
मोहाली: मोहाली इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असेलल्या क्रिकेट कसोटी सामन्यात, श्रीलंकेनं पहिल्या डावात ४ गडी बाद १०८ धावा केल्या आहेत.
आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारतानं कालच्या धावसंख्येत २१७ धावांची भर घालत, आपला पहिला डाव, ८ गडी बाद ५७४ धावांवर घोषित केला. रविंद्र जडेजा यानं कसोटी कारकिर्दीतलं दुसरं शतक झळकावत नाबाद १७५ धावा केल्या. ही त्याची वैयक्तिक आणि भारतासाठी सातव्या क्रमांकाच्या फलंदाजानं केलेली सर्वौच्च धावसंख्या ठरली आहे.
त्याने कपिल देव यांचा कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीयाचा 35 वर्षांचा विक्रम मोडला. कपिलने डिसेंबर 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कानपूरमध्ये 7 क्रमांकावर फलंदाजी करताना 163 धावा केल्या होत्या. जडेजाने आज ती धावसंख्या एका डावात पार केली ज्यावर वर्ग आणि अधिकाराचा शिक्का बसला होता. अश्विननेही शानदार ६१ धावांची खेळी केली.
त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेचे फलंदाज, ठराविक अंतरानं बाद होत गेले. त्यामुळे श्रीलंकेचा डाव गडगडला. आजचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेनं ४ गडी गमावत केवळ १०८ धावा केल्या होत्या. भारताच्या आर. अश्विन यानं २, तर जसप्रित बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.