State Board of Education Class 12th Exam Starts From Today
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ
साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजमध्ये 12 वीची परीक्षा सुरळीत सुरू.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यात सुरुवात झाली. यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीनं देण्यात आली. यंदा परिक्षा देणाऱ्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे असून त्यांची संख्या 6 लाख 60 हजार 780 इतकी आहे. राज्यातील तीन हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.
परीक्षेतले गैरप्रकार टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत.तसंच गैरप्रकार टाळण्यासाठी यंदापासून प्रथमच लेखी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसमोर शिक्षा सूची आणि उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचं वाचन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या कालावधीत राज्यात सर्वत्र प्रतिबंधात्मक आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या परीक्षेत माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेलं वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आवाहन राज्य मंडळाच्या वतीनं करण्यात आले आहे.
पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मुलांना देण्यात येणार आहे.ही परीक्षा 21 मार्चपर्यंत चालणार आहे.
साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजमध्ये 12 वीची परीक्षा सुरळीत सुरू.
हडपसर : साधना विद्यालय व आर. आर . शिंदे ज्युनियर कॉलेज हडपसर मध्ये आज 12 वीच्या परीक्षेसाठी विज्ञान विभागातील 708 विद्यार्थांनी, 597 विद्यार्थी, त्यापैकी दिव्यांग 05 विद्यार्थी असे एकूण 1305 विद्यार्थी साधना केंद्रात प्रविष्ठ आहेत.
या परीक्षार्थीना सर्व भौतिक सुविधा शालेय प्रशासनाकडून पुरवण्यात येणार आहेत.शाळा प्रशासनाकडून परीक्षेचे उत्तम नियोजन करण्यात आलेआहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com