State-level exhibition of Khadi and Village Industries products
खादी व ग्रामोद्योगी उत्पादित वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत खादी व ग्रामोद्योगी उत्पादित वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यात खादी व ग्रामोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण कारागीरांनी उत्पादित केलेल्या खादी वस्त्र व ग्रामोद्योगी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत पीएमईजीपी बँकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस अंतर्गत तरतूद आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा यांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता होणार आहे. संपूर्ण राज्यांतून ग्रामोद्योगी उत्पादक सहभागी होणार आहेत. ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण वासीयांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.