State restrictions have not been lifted.

State restrictions have not been lifted; Proposals for new rules are still under consideration.

Corona infection is still not completely eradicated. Infection is still on the rise in some places in rural areas. Considering the deadly and changing form of the coronavirus, it is important to decide whether or not to relax. State restrictions have not been lifted. The Break the Chain has begun to relax some of the restrictions, with the Disaster Management Department deciding on five stages, the weekly positivity rate, and the availability of oxygen beds. Detailed guidelines for tightening or relaxing the restrictions in the state based on these criteria will be notified by the ruling.

Thus, proposals for relaxation of step-by-step restrictions based on criteria are under consideration and implementation will be considered after full review by the concerned administrative units of the districts. The local administration is investigating the matter. Only after that, the official decision will be informed and how this decision will be implemented will be clarified by the above ruling.

Corona precautions

 

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्स ची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्याच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  या विषयी माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *