Information about tourist areas is easily available to tourists thanks to WhatsApp chatbot app
व्हॉट्सॲप चॅटबॉट ॲपमुळे पर्यटन क्षेत्रांची माहिती पर्यटकांना सहजरित्या उपलब्ध
‘व्हॉट्सॲप चॅटबोट’ आणि ‘आई’ महिला केंद्रित धोरण ॲपमुळे राज्याच्या पर्यटनाला गती मिळेल – पर्यटन मंत्री गिरीश महाजन
वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राज्य पर्यटन परिषदेचे आयोजन
मुंबई : व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची माहिती नव्याने सुरू केलेल्या ॲपमुळे, पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजिकांना होईल या दोन्ही उपक्रमांमुळे राज्याच्या पर्यटनाला चालना मिळेल असे मत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राज्य पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की,राज्यात पर्यटन क्षेत्रांची माहिती पर्यटकांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले जाणे ही काळाची गरज आहे.राज्यात येणा-या पर्यटकाला उत्तम मुलभूत सोयी सुविधा, पर्यटन स्थळांची अचूक माहिती देखील प्राप्त होईल. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा,महिलांचे आर्थिक स्वावलंबन व्हावे यासाठी ‘आई’ हे महिला केंद्रीत पर्यटन धोरण आणले आहे या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात येत आहेत याची अद्ययावत माहिती महिलांना आई पॉलिसी धोरण ॲपच्या माध्यमातून होण्यासाठी मदत होईल.
पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या, राज्यातील ११ गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत नामांकन मिळाले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगाच्या पर्यटनस्थळात आपल्या पर्यटन स्थळांना मिळालेले स्थान यामुळे निश्चितच पर्यटक वाढतील.पर्यटन विभाग पर्यटन वाढीसाठी अनेक धोरण आखत आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नव्याने आलेले ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण निश्चितच राज्यातील पर्यटन क्षेत्रातील महिलांच्या विकासाला हातभार लावेल असेही त्या म्हणाल्या.
पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, पर्यटन क्षेत्रात पाच लाख रोजगार उपलब्ध व्हावेत अशी धोरण आखली जात आहेत. राज्यातील संस्कृतीवर आधारित वेगवेगळे महोत्सव आयोजित करून स्थानिक ठिकाणी रोजगार प्राप्त व्हावा यासाठी पर्यटन संचालनालय काम करीत आहे. आई महिला केंद्रित पर्यटन धोरण देखील प्रभावीपणे राबवत आहे.
पर्यटन तज्ज्ञ स्वाती खांडेलवाला,डॉ.संतोष सुर्यंवशी,सगुना बाग ॲग्रो टुरिझमचे संचालक चंदन भडसावळे,पॅराग्लाइंडीग व्यावसायिक विस्तापस खरस,सचिन पांचाळ,केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या मोनिका प्रकाश,ग्रामीण पर्यटन तज्ज्ञ प्रा.डॉ.कामाक्षी माहेश्वरी यांनी पर्यटन विषयक विचार मांडले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “व्हॉट्सॲप चॅटबॉट ॲपमुळे पर्यटन क्षेत्रांची माहिती पर्यटकांना सहजरित्या उपलब्ध”