States and Union Territories should improve Covid restrictions due to declining Covid patients – Union Ministry of Health
कमी होणाऱ्या कोविड रुग्ण संख्येमुळे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड निर्बंधांमध्ये सुधारणा कराव्या- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली : सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी कमी होणाऱ्या कोविड रुग्ण संख्येचा कल लक्षात घेऊन निर्बंधांमध्ये आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल यासंदर्भात सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र पाठवलं आहे. कोविड सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्या सीमा आणि विमानतळांवर काही ठिकाणी अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले होते. निर्बंधांमुळे लोकांच्या हालचाली आणि व्यवहारांमध्ये अडथळा येऊ नये हे देखील महत्त्वाचं असल्यामुळे दैनंदिन रुग्ण संख्या आणि संक्रमणाच्या प्रसारावर लक्ष ठेवून निर्बंधांमध्ये आवश्यक ते बदल करावेत असं कळवण्यात आलं आहे.
२१ जानेवारीपासून देशातील कोविड रुग्ण संख्येत सातत्यानं घट होत आहे तसचं गेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्ण संख्या ५० हजार ४६७ झाली असून गेल्या २४ तासांत ती २७ हजार ४०९ इतकी खाली आली आहे.