मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण

Pune Municipal Corporation Logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Training on symptoms causes and remedies of mental illness

मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण

पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनी व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनी व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना मानसिक आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे आणि पॅरामेडिकल्सचे ज्ञान वाढविणे याबाबत प्रशिक्षण/ कार्यशाळा दिनांक १२/०९/२०२३ आयोजित करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणाचा लाभ ४०० अधिकारी /कर्मचारी यांनी घेतला.Pune Municipal Corporation

प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, एनएएम, जीएनएम यांना ‘मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण डॉ. स्मिता पानसे व डॉ. सनद पवार यांचेकडून देण्यात आले . तसेच दुपारच्या सत्रात 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मानसिक आरोग्य आणि वैय्यक्तिक कल्याण याबाबत चे प्रशिक्षण डॉ. अनघा लवळेकर यांनी दिले. त्या नंतर  ‘ताणतणावाचे व्यवस्थापन करून कामाची परिणामकारकता व गती कशी वाढवावी’ याबाबतचे मार्गदर्शन श्री राजीव नंदकर, (उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका यांचेकडून देण्यात आले.
श्री नंदकर यांनी यावेळी महानगरपालिकेचे २०० अधिकारी यांची वेलनेस स्कोअर व तणाव चाचणी स्कोअर तपासणी करून घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी कामकाजात गतिमानता कशी आणावी याबाबत टिप्स त्यांनी दिल्या.

यावेळी डॉ. सीमा उपळेकर यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ‘मानसिक आरोग्य माहिती पुस्तकेचे केलेले मराठी भाषांतर बाबत माहिती सर्वांना देऊन ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली.

या कार्यशाळेमुळे  पुणे महानगरपालिका प्रशासन कार्यक्षमतेने व परिणामकारक रीतीने चालविणे व प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी अधिकारी / कर्मचा-यांना उपयोग होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या प्र.आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, श्री राजीव नंदकर,(उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका, पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती केतकी कुलकर्णी व डॉ. सीमा उपळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा उपळेकर यांनी केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
राज्यातील विकासप्रकल्पांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
Spread the love

One Comment on “मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *