Take care that there will be no crowd in public places under any circumstances – Deputy Chief Minister Ajit Pawar.
Although some elements in the district, including Pune and Pimpri-Chinchwad metropolitan areas, have been allowed to start transactions within the stipulated time, care should be taken to ensure that public places are not crowded under any circumstances. Citizens should also abide by all vigilance rules, appealed Deputy Chief Minister and District Guardian Minister Ajit Pawar today. He said that the government was focusing on providing quality health facilities in rural areas. He was speaking at a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar at the Council Hall in Pune to review the Corona situation and measures.
During the meeting, Deputy Chief Minister Ajit Pawar inquired about the current status of Coronavirus in the Pune district, the current status of Mucormycosis, measures to be taken by the administration, medical facilities for children, and vaccination. Stating that the participation of all stakeholders is important to break the chain of coronavirus infection, Deputy Chief Minister Ajit Pawar said that even though the number of coronavirus patients is declining, it will not go unnoticed. Crowds are on the rise in rural areas including Pune and Pimpri-Chinchwad. This is a matter of concern. Citizens should not crowd public ceremonies, strictly follow government rules. He also instructed action in crowded places. Citizens need to be more vigilant in this regard, he said. The administration should make efforts to make the district self-sufficient in oxygen by inspecting the oxygen plant in the district from time to time. Kovid hospitals should use the medicines as per the guidelines. Deputy Chief Minister Ajit Pawar also directed to check the bills collected from the patients and take action against the hospitals which are charging extra bills.
Try to make the district self-sufficient in terms of oxygen.
Use the medication as directed by Kovid Hospitals.
Inspect the oxygen plant from time to time.
Take action against hospitals that charge extra.
Government’s efforts to make more vaccines available.
Deputy Chief Minister Ajit Pawar
At this time, Mayor Muralidhar Mohol, ZP. President Nirmalatai Pansare, Min. Girish Bapat, Kha. Shrirang Barne, MLA Adv Ashok Pawar, MLA Sanjay Jagtap, MLA Sunil Tingre, MLA Sunil Shelke, MLA Chetan Tupe, MLA Rahul Kul, MLA Siddharth Shirole also raised important issues. Dr. Subhash Salunke said that although the number of coronary heart disease patients is declining, it cannot be ignored, adding that everyone needs to strictly follow the precautionary rules.
Divisional Commissioner Saurabh Rao said the number of corona cases in the district has been declining this week as compared to last week. The administration informed about the measures being implemented in the district, sample testing of the citizens, affected patients, hospital management, availability of ambulances and hearses, jumbo covid hospital management, vaccination status, patient rate of mucormycosis, mortality.
Pune Municipal Commissioner Vikram Kumar and Pimpri Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil informed about the measures being taken by the Municipal Corporation. District Collector Dr. Rajesh Deshmukh and ZP Chief Executive Officer Ayush Prasad gave information about the condition of corona patients in rural areas and measures. The meeting was attended by the chief officers of various agencies.
कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार.
पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही सर्व दक्षता नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह ग्रामीण भागात गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसते आहे. ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी सार्वजनिक समारंभाला गर्दी करू नये, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे. गर्दी होणाऱ्या ठिकाणी कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनी याबाबत अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन बाबत जिल्हा स्वंयपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.
कोविड रुग्णालयांनी औषधांचा वापर मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करा.
ऑक्सिजन प्लॅन्टची वेळोवेळी तपासणी करा.
जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा.
अधिकाधिक लस उपलब्धतेसाठी शासनाचा प्रयत्न.
उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्ह्यात ऑक्सिजन प्लॅन्टची वेळोवेळी तपासणी करून जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, तसेच कोविड रुग्णालयांनी औषधांचा वापर मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करावा, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प. अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खा. गिरीष बापट, खा. श्रीरंग बारणे, आमदार ॲड अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही महत्वाचे विषय मांडले.
डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुर्लक्ष करून चालणार नाही, प्रत्येकाने दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी होताना दिसत आहे. प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.