The first high-level talks between Russia and Ukraine on a ceasefire and other issues failed
युद्धविराम आणि इतर मुद्द्यांबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेली पहिली उच्चस्तरीय चर्चा निष्फळ
अफगाणिस्तान : युद्धविराम आणि इतर मुद्द्यांबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेली पहिली उच्चस्तरीय चर्चा निष्फळ ठरली आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह आणि युक्रेनचे परराष्ट्रमंत्री
दिमित्री कुलेबा यांच्यात अफगाणिस्तानमध्ये अंतालिया इथं ही चर्चा झाली.
रशियानं युक्रेनबाबत असलेले पूर्वग्रह या चर्चेत मध्ये आणल्याचा आरोप कुलेबा यांनी केला. मात्र तोडगा काढण्यासाठी लावरोव यांच्याशी पुढं चर्चा करायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
युक्रेनशी चर्चा चालू ठेवण्याची रशियाचीही इच्छा असल्याचं लावरोव्ह यांनी सांगितलं. विशेष मुद्द्यांवर युक्रेनचे अध्यक्ष व्लोद्योमीर जेलेंस्कीय यांच्याशी विचारविनिमय करायला रशियाचे अध्यक्ष व्ला दिमीर पुतिन तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.