Electoral roll revision program announced for teachers’ constituencies
मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकीकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 डिसेंबर 2023 रोजी संपला असला, तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीकरिता मतदार नाव नोंदणी करण्याकरिता निरंतर अद्यावतन कार्यक्रम (Continuous Updation) प्रक्रिया सुरु राहणार आहे. पुरवणी यादीच्या स्वरुपात मतदारांची नावे अंतिम मतदार यादीस जोडण्यात येतील. मात्र, या निवडणुकांच्या नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर मतदार यादीमध्ये कोणतीही दुरुस्ती/सुधारणा करता येणार नाही. 30 डिसेंबर 2023 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्यांमध्ये पात्र व्यक्तीचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसेल, अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये विहित प्रपत्रातील अर्जाद्वारे अद्यापही आपली नाव नोंदणी करु शकते, असे राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपसचिव म. रा. पारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
श्री. पारकर यांनी म्हटले आहे की, विधानपरिषदेच्या मुंबई व कोकण विभाग पदवीधर, मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. त्याकरिता मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात आाला. आता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
या मतदार संघामध्ये सन 2018 मध्ये नोंदविण्यात आलेल्या मतदारांची संख्या व सन 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीतील मतदारांची संख्येची माहिती अशी (अनुक्रमे मतदारसंघाचे नाव, सन २०१८ च्या निवडणुकीकरीता झालेली एकूण मतदार नोंदणी, सन २०२४ च्या निवडणुकीकरीता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीप्रमाणे एकूण मतदार नोंदणी) : मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ, ४५७३५, ९११२०. कोकण विभाग पदवीधार विधान परिषद मतदारसंघ, १०४४८८, १७७४६५. मुंबई शिक्षक विधान परिषद मतदारसंघ, ८७२२, १४५५८. नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ, ५३८९२, ६४८०२.
पदवीधर मतदार नाव नोंदणी करण्याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज (प्रपत्र क्र.18) भरु शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://gterollregistration.mahait.org/ ज्या पात्र शिक्षक मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नाही, असे पात्र शिक्षक मतदार नाव नोंदणी करण्याकरिता ऑफलाईन अर्ज (प्रपत्र-19) त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत भरु शकतात. यासाठीचे अर्ज विभागीय आयुक्त (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी), संबधित जिल्हाधिकारी (या निवडणुकीचे मतदार नोंदणी अधिकारी), विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणे, हा नमुना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Downloads/DownloadForms/Form-18.pdf तसेच, Downloads/DownloadForms/Form-19.pdf व Downloads/DownloadForms/Certificate -Form-19.pdf येथे सुद्धा उपलब्ध आहे, असेही सह मुख्य निवडणूक अधिकारी श्री. पारकर यांनी म्हटले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर”