शिक्षक जीवनाला आकार देतात – प्राचार्य दत्तात्रय जाधव

Sadhana Vidyalaya Hadapsar साधना विद्यालय हडपसर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Teachers shape lives – Principal Dattatraya Jadhav.

शिक्षक जीवनाला आकार देतात – प्राचार्य दत्तात्रय जाधव.

साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे शिक्षकदिन साजरा

हडपसर : भारतीय संस्कृतीत गुरू – शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षक शिष्यांना मार्गदर्शन करून योग्य वाटेवर नेतात.सामान्य व्यक्ती ते यशस्वी व्यक्ती या वाटचालीत शिक्षकांचे स्थान बहुमोल आहे. आईवडिल या प्रथम गुरू नंतर शाळेतील शिक्षक आणि इतर सर्व शिक्षक जीवनाला आकार देतात. असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.विद्यालयातील उपशिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी गुरूंचे महत्त्व सांगणारे गीत सादर केले. त्यानंतर पियुष कोरडे ,वीर गोरे या
विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

कामिनी केदारे यांनी शिक्षक मनोगतात शिक्षकदिन साजरा करण्याचा उद्देश,गुरूंचे महत्त्व सांगितले. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक-दिन साजरा करून शिक्षकांची भूमिका समजून घेतली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,माधुरी राऊत,आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे,पांडूरंग गाडेकर,धनाजी सावंत
सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता पाषाणकर यानी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ यांनी केले.तर आभार वैशाली उफाड यांनी मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Spread the love

One Comment on “शिक्षक जीवनाला आकार देतात – प्राचार्य दत्तात्रय जाधव”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *