३५ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज रात्री १२ वाजता सुरु होणार

The 35th Pune International Marathon will start tonight at 12 noon

३५ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज रात्री १२ वाजता सुरु होणार35-Pune-International-Marethon

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आज मध्यरात्री आयोजित करण्यात आली आहे. कोरोना संसर्गानं गेले दोन वर्ष ही स्पर्धा घेण्यात आली नाही. यंदा, आज मध्यरात्री सुरु होणारी ही स्पर्धा उद्या सकाऴी संपेल.

यंदाच्या ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ३० परदेशी धावपटु आणि अडीच हजार भारतीय धवपटुचा लवाजमा पुर्ण मॅरेथॉन,अर्ध मॅरेथॉन, १०,५,३ किलोमीटर यासह व्हिलचेअर स्पर्धेंत आपलं कसब आजमवणार आहेत.

पुर्ण आणि अर्ध मॅरेथॉन स्पर्धैला आज मध्यरात्री तर उर्वरित गटाच्या स्पर्धा उदया पहाटे पाच ते सकाऴी सव्वासहा पर्यत पार पडतील. आज मध्यरात्री सणस मैदानापासुन सुरुवात होणार आहे. बाजीराव रस्ता, आप्पा बळवंत चौक, सिंहगड रस्ता, गणेशमळा मार्गे सणस मैदानावर स्पर्धेचा समारोप होईल.

या मार्गावर सात वैद्यकिय सेवा केंद्रे, अडीचशे वैद्यकिय कर्मचारी, मार्गावर धाव्पटुंच्या सहकार्यासाठी एक हजार कार्यकर्ते सायकल पायलेंट, पंधरा खाटांचे सुसज्ज मिनी रुग्णालय, महावितरणाच्या सहाय्याने अतिरिक्त दिव्यांची व्यवस्था, पुणे पोलीसांची जास्तीची गस्त या सा-या ताफ्यासह मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.

कोरोना संसर्गाचं सावट, वाहतुकीचा उडणारा बोजवारा, स्पर्धा पाहण्यासाठी पुणेकरांची होणारी गर्दी या बाबींना निश्चितच आऴा बसेल.

तसेच रात्रीचं थंड हवामान धावपटुनां पोषक ठरणार असुन त्यांची कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे या जमेच्या बाजु असल्या तरी मध्यरात्री स्पर्धा भरवण्याचा अनोखा प्रयोग किती फलद्रुप होईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *