The best support for a career in Mallakhamba sports, Next year, a state-level Mallakhamba competition will be organized
Announcement of BJP State President MLA Chandrakantdada Patil
मल्लखांब क्रीडा प्रकारात करिअरसाठी सर्वतोपरी मदत, पुढील वर्षी राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करणार
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
पुणे : भारतीय क्रीडाप्रकार नवोदित खेळाडुंमध्ये रुजावा, यासाठी मल्लखांबसारख्या क्रीडा प्रकारात करिअर करु इच्छिणाऱ्या खेळाडुंना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, पुढील वर्षी राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचीही घोषणा आ. पाटील यांनी केली.
शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अनुराधा येडके यांनी कोथरुडमधील पटवर्धन बाग येथील ग्राउंडवर दि. 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी आमदार चंद्रकांतदादा पाटील पुरस्कृत निमंत्रित जिल्हास्तरीय आमदार चषक मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 22 संलग्न संस्थेतील 450 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या सांगता कार्यक्रमात आ. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.
या स्पर्धेस पुण्यातील मल्लखांबातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान कबड्डीतील अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, कबड्डीतील प्रथम पुरस्कार विजेत्या महिला श्रीमती शकुंतला खटावकर, मल्लखांबचे शिवछत्रपती पुरस्कार विजेत राजू जालनापूरकर, शाहू-लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या अध्यक्षा प्रा. अनुराधा एडके, सचिव राज तांबोळी, रविंद्र पेठे, चंद्रकांत पवार, जितेंद्र खरे, अभिजीत भोसले, सचिन परदेशी, सचिन पुरोहित, प्रतीक कोरडे, आकाश तगारे, चिन्मय बापट, सानिका नाडगौडा आदी उपस्थित होते.
आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “भारतीय खेळाच्या विकासासाठी खेळांना राजाश्रय मिळावा यासाठी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपाचे सरकारच्या काळात अनेक प्रयत्न केले. यात खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कायदा करुन, शासकीय नोकरीत सामावून घेतले. याचा ३०० पेक्षा जास्त खेळाडुंना लाभ झाला असून, अनेकांना प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या नोकरीची संधी मिळाली. भविष्यातही मल्लखांबसारख्या क्रीडा प्रकारात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी सर्वतोपरी मदत करु,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
रोशनी मरगजेच्या शैक्षणिक पालकत्वाची घोषणा
शाहू-लक्ष्मी कला अकादमीची रोशनी मरगजे ही उत्तम मल्लखांबपटू असून, तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षणातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोशनीची आई ही घरकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती यावेळी आ. पाटील यांना मिळाली. यानंतर तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याची घोषणा आ. पाटील यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे आपल्या खेळाडुंना आपल्यातील कलागुण दाखविण्याची संधी मिळाली नाही. यंदा कोविडचे नियम पाळून आपण जिल्हास्तरिय स्पर्धेचे आयोजन केले. पण पुढील वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करणार असून, त्याचे नियोजन आतापासून सुरु करावे.” अशा सूचना आ. पाटील यांनी संयोजकांना दिल्या. तसेच स्पर्धेतील पहिल्या दहा उत्कृष्ट खेळाडूंना पाच हजार रुपयांची खेळ साहित्य खरेदीची कुपनही देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, स्पर्धेमध्ये प्रत्येक गटातील पहिला तीन खेळाडूंना आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दोन लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला यांनाही रोख पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेस प्रथम अर्जुन पुरस्कार विजेती महिला कु हिमानी परब आणि कबड्डीतील प्रथम पुरस्कार विजेत्या महिला श्रीमती शकुंतला खटावकर, पुण्यातील मल्लखांबातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान कबड्डीतील अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी उपस्थिती लावली.
तसेच, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी काम पाहिले. यामध्ये रविंद्र पेठे, जितेंद्र खरे, राज तांबोळी, चंद्रकांत पवार,अभिजीत भोसले, सचिन परदेशी, सचिन पुरोहित, प्रतीक कोरडे, आकाश तगारे, चिन्मय बापट, सानिका नाडगौडा इत्यादींनी मदत केली.